spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राजकीय पक्षांना करता येणार नाही गट नोंदणी, हे आहे कारण

नागपूर :- महानगर पालिकांच्या निवडणुका पार पडल्या. बहुतांश ठिकाणी भाजप आणि महायुतीची सत्ता बसणार असल्याचे चित्र आहे. पूर्व विदर्भातील नागपूर व चंद्रपूर या दोन महापालिकांमध्ये निवडणुका झाल्यात. नागपूरचे महापौर पद हे सर्वसामान्य (महिला) वर्गासाठ आरक्षित आहे. तर चंद्रपूर महापालिकेचे महापौर पद हे ओबीसी वर्गासाठी आरक्षित आहे. महानगर पालिकेतील महापौर पदाच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी रोजी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

परंतु अद्याप भाजपने गट व गट नेत्याची नोंदणी केली नाही. त्यांचे नावच निश्चित झाले नसल्याचे सांगण्यात येते. तर चंद्रपूरमधील भाजप व कॉंग्रेस पक्षानेही गट नोंदणी केली नाही. कॉंग्रेसमध्ये गट नेत्यावरून वाद समोर आला होता. तुर्तासतरी या वादावप पडदा पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्याकडून गट व गट नेत्याची नोंदणीसाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परंतु राजकीय पक्षाना तुर्तासतरी नोंदणी करता येणार नाही. शुक्रवारला सुद्धा करता येणार नाही. शनिवार व रविवार सुट्टी आहे. त्यामुळे त्यांना सोमवारचीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी या अभ्यास दौऱ्यावर असल्याने गट नोंदणीची प्रक्रिया तुर्तास होणार नसल्याचे समजते. नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुका पार पडल्यात. नागपुरात भाजपचा महापौर होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यांच्याकडे बहुमताचा आकडा आहे. या पदासाठी शिवाणी दाणी, विशाखा मोहोड, दिव्या धुरडे. नीता ठाकरे, साधना बरडे, अश्विनी जिचकार यांची नावे चर्चेत. परंतु अद्याप त्यांच्याकडून गट व गट नेत्याची नोंदणी विभागीय आयुक्तांकडे केली नाही.

भाजपचा गटनेता अद्याप निश्चित झाला नसल्याचे सांगण्यात येते. नागपुरात कॉंग्रेस, मुस्लीम लिग व एमआयएम पक्षाने नोंदणी केली आहे. तर चंद्रपूर महापालिकेतील स्थितीही तशीच आहे. कॉंग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षाकडून नोंदणी करण्यात आली नाही. गुरुवारला एकाही पक्षाने नोंदणी केली नसून उद्या शुक्रवारला सुद्धा ती होणार नाही. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी कर्नाटक राज्यात अभ्यास दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर सुद्धा आहेत. बिदरी यांनी कुणाकडेही प्रभार दिला नाही. त्यामुळे त्या परत रुजू होतपर्यंत कोणतीही प्रक्रिया होणार नाही.

Popular Articles