spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वायगाव येथे तलाव खोलीकरणास प्रारंभ

किशोर साहू, मौदा :- गट ग्रामपंचायत सिरसोली अंतर्गत येत असलेल्या वायगाव येथील तलाव खोलीकरणास एक सप्ताह पूर्वी सुरुवात झाली असून, येत्या पंधरा दिवसात काम पूर्णत्वास येणार असल्याचे, या तलाव खोलीकरणाचे भंडारा येथील कंत्राटदार फुलबांधे यांचे सुपरवायझर दुर्योधन गोबाडे यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले.

या तलावातून निघणारे मुरूम तलाव सभोवताल व वायगाव येथील पांधण रस्ते , शासकीय कामात निशुल्क वापरता येणार आहे .वायगाव बाहेर या तलावाच्या मुरूम नेता येणार नाही असे सुपरवायझर गोबाडे यांनी सांगितले. या तलाव खोलीकरणाची अंदाजपत्रकीय किंमत अंदाजे 30 लक्ष रुपये असल्याचे गोबाडे यांनी सांगितले .मात्र अजूनही तलाव खोलीकरणाचे फलक तलाव शेजारी लावण्यात आलेले नाही हे विशेष !


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.