spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन २०२५ मुदतवाढ

 

नागपूर, दि. ७  : महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम २०२५आणि रब्बी हंगाम २०२५-२६ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) लागूकरण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यानुसार नागपूर जिल्हयात अधिसूचित क्षेत्रातील,अधिसूचित पिकासाठी, उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरीपहंगाम २०२५व रब्बी हंगाम २०२५-२६ या १ वर्षाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचितपिकासाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलाआहे. नागपूर जिल्हयात भारतीय कृषि विमा कंपनी ह्या  विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार)योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे / विमा हप्त्याची रक्कम कपात करणे / ऑनलाईन अर्जकरण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै २०२५ हा होता. परंतु गत वर्षीच्या तुलनेत कमीसहभाग, शेतकऱ्यांकडे Agristack Farmer ID नसणे, PMFBY पोर्टल सेवेतील व्यत्यय,आधार (UIDAI) व CSC सर्व्हरवरील व्यत्यय, राज्याच्या भूमीअभिलेख पोर्टलच्यातांत्रिक सेवेतील व्यत्यय इत्यादीमुळे शेतकऱ्यांच्या योजनेतील सहभागावर होणारा परिणामलक्षात घेऊन केंद्र शासनाच्या निर्देशानुसार योजनेत बिगर कर्जदार शेतकऱ्यांनासहभागी होण्यासाठी दि. १४ ऑगस्ट, २०२५ व कर्जदार शेतकऱ्यांना दि. ३० ऑगस्ट, २०२५पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढीस मान्यता दिली आहे.    तरीजास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता आपल्या नजीकच्या बँकशाखेत तसेच आपले सरकार सेवा केंद्र मध्ये विहित मुदतीत विमा हप्ता भरून सहभागीव्हावे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषी अधिकारीतालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर यांनी केले आहे.

Popular Articles