spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रहार इनसाइडर न्यूज टुडे, कामठीत १ कोटी ११ लाखांची अवैध सुपारी जप्त, कोल्ड स्टोरेज सील

कामठी :- दैनिक इनसाईडर न्यूज टुडे ने 11 जून च्या अंकात मुंढे साहेब,जरा ‘कामठी’ तालुक्याकडे बघा या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत काल दिनांक १२ जून २०२६ रोजी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे एक मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ११ लाख 7 हजार रुपयांची अवैध सुपारी जप्त केली आहे. ही कारवाई नवीन कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आवंढी येथील ‘अरिहंत कोल्ड स्टोरेज, ‘ येथे करण्यात आली.

गुप्त माहितीच्या आधारे धाड

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त परिमंडळ ६ यांना एका गुप्त बातमीदाराकडून अरिहंत कोल्ड स्टोरेजमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध सुपारीचा साठा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक संयुक्त पथक तयार करून या ठिकाणी छापा टाकण्यात आला.

१ कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

या संयुक्त कारवाईत पोलिसांना कोल्ड स्टोरेजमध्ये ५८० पोती सुपारी आढळून आली. प्रत्येक पोत्यात ५० किलो याप्रमाणे एकूण २९,००० किलो (२९ टन) सुपारी जप्त करण्यात आली आहे. बाजारभावाप्रमाणे ३८३ रुपये प्रति किलो दराने या जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत १ कोटी ११ लाख ७ हजार रुपये इतकी आहे.

ही धडक कारवाई नवीन कामठी पोलीस स्टेशन चे अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशन कपिल नगर चे अधिकारी व अंमलदार अन्न व औषध प्रशासन नागपूर चे पथक आदींनी केली.

या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी रवीना नागले, मेघा फाळके, अखिलेश राऊत आणि राहुल खंडागळे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.

कोल्ड स्टोरेज सील

अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी तात्काळ जप्त केलेल्या सुपारीचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. पुढील तपास होईपर्यंत अरिहंत कोल्ड स्टोरेजमधील हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करून कोल्ड स्टोरेज सीलबंद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध सुपारीचा धंदा करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Popular Articles