spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रहार जनशक्ती पक्षातर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पाणी वितरण

भंडारा :- या देशातील प्रत्येक माणसाला माणुसकीची जाणीव करून देणारे तथा संविधानामार्फत सर्वांचे हक्क व अधिकार सुरक्षित महामानव, परमपूज्य, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त मागील ३ वर्षांपासून प्रहार जनशक्ती पक्ष भंडारा तर्फे पाणी वितरण करण्यात येत आहे.

हीच परंपरा जोपासत यावर्षीही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मंगळवार १४ एप्रिल रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समिती मार्फत शहरातून निघणाऱ्या सार्वजनिक रैलित सहभागी होणाऱ्या लोकांना प्रहार जनशक्ती पक्षाव्दारे पाणी वितरण करण्यात आले. यावेळी बहुतांश लोकांना उन्हाळयाच्या या दिवसांमध्ये पाणी पाजण्याचे समाधानही वाटले व अनेक नागरिकांनी याचा लाभ ही घेतला.

यावेळी आयोजित कार्यक्रमास प्रहार जनशक्ती पक्ष भंडारा जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी, प्रहार जनशक्ती पक्ष भंडारा जिल्हासचिव चारूल रामटेके, प्रहार भंडारा शहर अध्यक्ष मनिष काळे, प्रहार विघार्थी संघटना शहर प्रमुख आदेश मेश्राम तसेच शहर सचिव साहेबराव साखरकर, तुषार मेंढे, विजय हटवार, निहार वासनिक, स्वप्निल मेश्राम, नैतिक गजघाटे, साकेत मुंगाटे व अन्य पदाधिकारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Popular Articles