spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शेतात आगीन झालेली गव्हाची नुकसान भरपाई शेतक-याना त्वरित द्या

– तहसिलदार पारशिवनी हयाना शेतक-यांचे निवेदन

कन्हान :- पारशिवनी तहसील अंतर्गत टेकाडी- बोरडा पांधन रस्त्यालगत शेतात अचानक आग लागुन जवळ पास ५५ ऐकरातील उभे गव्हाचे पीक जळुन राख झाल्याने काबडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंड चा घास हिसकावल्याने शेतक-यांचा परिवारांच्या उदर्निवा हा करिता शासना कडुन तात्काळ नुकसान भरपाई मिळवुन देण्याची मागणी तहसिलदार पारशिवनी याना निवेदन करण्यात आली आहे.

(दि.२३) मार्च रोजी सका़ळी ११ च्या दरम्यान टेकाडी- बोरडा पांधन रस्त्यालगत शेत शिवारातील शेताच अचानक शेतकऱ्यांच्या उभ्या गहु पिकाला दुर्दै वाने आग लागल्यामुळे हातात आलेले पिकाची राख रांगोळी झाली. गहु पीक उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात असताना अचानक आग लागली. शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. यात रतन कांबळे व गणेश कांबळे यांची १३ एकर, कमलाकर राऊत २ एकर, श्यामरा व मरघडे २.५ एकर, गुलाब राउत ५ एकर, नामदेव कांबळे १.५ एकर, सदीप राऊत ५ एकर, रामभाऊ राऊत २ एकर, शकुन सावरकर २ एकर, उत्तम सातपैसे ६ एकर, रामराव सातपैसे १.५ एकर, येणेकर १२.५ एकर अशी ५५ एकर शेती बेचिराख झाली आहे . त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन वर्षभर कष्ट करू न हातात आलेले पिक जळुन खाक झाले. शेतक-यांनी आपल्या परिवारांचा कसा उदरनिर्वाह करावा. या संकटाने शेतकरी चिंतातुर असल्याने शेतक-यांनी मा. तहसिलदार पारशिवनी याना निवेदन देऊन आगीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५०,००० रुपये आर्थिक मदत शासनाकडुन मिळवुन द्यावी. अन्यथा आपल्या कार्यालया सामोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा सुध्दा देण्यात आला आहे. शेतकरी नेते भगवानदास यादव, राजु गुडधे, विशाधर कांबळे, श्यामराव मरघडे, उत्तम सातपैसे, सदिप राऊत, राम राऊत, अनुसया सावरकर, रतन कांबळे, गणेश कांबळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Popular Articles