spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गुमगाव माईन येथे डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम

खापा, वार्ताहर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त समता सांस्कृतिक मंडळ समिती, गुमगाव खान व मॉयल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. यादरम्यान भव्य टेनिस बॉल स्पर्धा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम दि. ७ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत आयोजित करण्यात आले होते.

त्यानिमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून आर. यु. सिंग उपमहाप्रबंधक खान (ग्रुप तीन), उमेश चरपे, मॅनेजर गुमगाव खान, कार्यक्रमाचे उद्घाटक पियुष बुरडे , नगराध्यक्ष नगरपरिषद खापा, नामदेव गजभिये नगरसेवक तथा गटनेता, लिला कमलेश बागडे नगरसेविका यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या आयोजित महोत्सव दरम्यान टेनिस बॉल स्पर्धा, महात्मा ज्योतिबा फुले जयंती, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, रेकॉर्डिंग डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

जयंती निमित्ताने १४ एप्रिलला सकाळी ८ वाजता गुमगाव खान वसाहत परिसर मध्ये स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून झेंडावंदन करण्यात आले. त्यानंतर बाईक रॅली काढण्यात आली. ही बाईक रॅली माईन, नवीन वस्ती येथील बुद्धविहार, बस स्टॅन्ड, जुनी वस्ती येथील कुंभारपुरा येथे स्थित प्रबुद्ध बुद्ध विहार येथे भेट देऊन नवीन वस्ती, बाजार चौक, नगरपरिषद येथे पोहोचली. तेथे नगरपालिकेद्वारा सर्व उपासक-उपासिकांचे स्वागत करण्यात आले. तसेच शहरात बाईक रॅलीचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले.

दुपारी चार वाजता दरम्यान टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे अंतिम सामना झाला. यात वेनम इलेव्हन, गुमगाव माईन व रुद्र इलेव्हन, नवीन वस्ती यामध्ये अंतिम सामना झाला. त्यात प्रथम पारितोषिक वेनम इलेव्हन, गुमगाव माईन यांना सचिन इंटरप्राईजेस, गुमगाव माईन तर्फे 21000 रुपये रोख व शिल्ड तसेच रुद्र इलेव्हन, नवीन वस्ती, खापा यांना द्वितीय पारितोषिक पियूष बुरडे नगराध्यक्ष खापा यांच्यातर्फे 15000 रुपये रोख व शील्ड प्रदान करण्यात आले. तसेच निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची व रेकॉर्डिंग डान्स स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरण करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता भीम रॅली काढून जल्लोष साजरा करण्यात आला.

सदर आयोजन समता सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक नामदेव गजभिये, उपाध्यक्ष कृष्णा पाटील, रोहन शेंडे, सचिव मनोज शेंडे, सहसचिव प्रफुल बागडे, कार्याध्यक्ष इंद्रजीत गजभिये, राहुल नारनवरे, कोषाध्यक्ष आशिष धनवटे, संघटन सचिव विलास बागडे, नितेश गजभिये, क्रीडा प्रमुख उमराव गजभिये, सतीश शेंडे, तसेच मॉडेल लिमिटेड समता क्रीडा मंडळ, गुमगाव खान, अध्यक्ष सौरभ बागडे, कार्याध्यक्ष ऋषभ पाटील, नमन गेडाम, उपाध्यक्ष शांतनु भिमटे, अमन कठौते, सचिव निकेतन गजभिये, सहसचिव पियूष बोरकर, दिनेश साबळे, कोषाध्यक्ष राहुल कठौते, आकीब शेख, संघटन सचिव आयुष सहारे, सागर वरखडे व समाजबांधवांच्या विशेष सहकार्य व समाज बांधवांच्या विशेष प्रयत्नाने आयोजन करण्यात आले होते. समारोपानंतर १५ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता महाभोजनदान करण्यात आले. या निमित्ताने सर्व उपासक, उपासिका व परिसरातील नागरिकांनी महाभोजनदानाचा आस्वाद घेतला.

Popular Articles