नागपूर ५ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने दिले जाणारे डॉ. आर. कृष्णकुमार सुवर्ण पदक नरखेड तालुक्यातील देवग्राम येथील अंत्योदय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगाडे यांना घोषित करण्यात आले आहे. विद्यापीठाचा शिक्षक दिन समारंभ अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
शिक्षक दिन समारंभाचे अध्यक्षस्थान माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूरचे माजी संचालक सतीश वटे तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांची उपस्थिती राहणार आहे. प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगाडे यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल २०२५ ह्या वर्षाकरिता ‘डॉ. आर. कृष्णकुमार सुवर्ण पदका’साठी मा. कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी डॉ. देवेंद्र भोंगाडे यांची निवड केली आहे. प्रस्तुत सुवर्ण पदक शुक्रवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाचे ‘गुरूनानक भवन’, कॅम्पस चौक ते अंबाझरी टी-पॉईट मार्ग, नागपूर येथे आयोजित शिक्षक दिन समारंभात त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.




