spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बीकेसीपी शाळेसमोर कचरा, सांडपाणी व गळतीची समस्या

– विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर 

कन्हान :- नगरपरिषदेच्या कचरा वाहतुक गाड्यांकडुन बीकेसीपी शाळेजवळ कचरा टाकला जात असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे मुख्य नाली वारंवार तुंबत असुन परिसरातील काही नागरिकांकडुनही तेथे शेण व इतर कचरा टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नालीतील सांडपाणी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ साचत असल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सुमारे १,५०० विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळेच्या परिसरात पाईपलाईनची गळतीही होत असुन त्यातील पाणी शाळा परिसरात साचत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येकडे नगर प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. शाळेचे सुपरवायझर युनिक कादरी यांनी संबंधित समस्येकडे लक्ष वेधत शाळेच्या स्वखर्चाने जेसीबी लावुन स्वच्छता करण्यात आली असुन नियमित स्वच्छता, नालीची साफसफाई आणि पाईपलाईनची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. यावेळी समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार, प्रविण समुद्रे, राकेश गावंडे, मनोज मेश्राम आणि गजराज यादव आदी प्रामुख्याने उपस्थित होते. नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने नगरप्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.