spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

“धरमपेठ झोन अंतर्गत अनधिकृत फूटपाथवरील पाल शेड हटाओ कार्यवाही सुरू”

नागपूर :- महानगरपालिका, धरमपेठ झोन क्र. ०२, अंतर्गत दि: 13/09/2026 ते 15/09/2026 रोजी केलेल्या अतिक्रमण कारवाई गोकुळपेठ, अमरावती रोड, सेमिनरी हिल्स व झिरो माईल्स ते लोकमत चौक पर्यंत धरमपेठ झोन अंतर्गत या ठिकाणी कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई आयुक्त मनपा नागपूर, पोलीस आयुक्त नागपूर शहर, उपायुक्त वाहतुक, नागपूर यांच्या संयुक्तिक मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अतिक्रमण निर्मुलन कारवाई मधे धरमपेठ झोन चे सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम, अतिक्रमण पथक धरमपेठ झोन, एन.डी.एस अधिकारी व कर्मचारी संपूर्ण कार्यवाहीमध्ये उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे गोकुळपेठ, अमरावती रोड, सेमिनरी हिल्स व झिरो माईल्स ते लोकमत चौक येथे धडक कारवाई करण्यात आली. सार्वजनिक रस्त्यावर उभारण्यात आलेले अनधिकृत शेड व तात्पुरती अतिक्रमण निष्कासित (Demolish) करून हा परिसर पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.