यवतमाळ :- हंगाम २०२५-२६ अंतर्गत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेनुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मुग, उडिद आणि सोयाबीन या पिकांची खरेदी नाफेडमार्फत करण्यात येणार आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया ३० ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली असून, खरेदी प्रक्रिया १५ नोव्हेंबर पासून सुरु होईल
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि.मार्फत जिल्ह्यात एकूण तीन खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत महागांव तालुका खरेदी विक्री समिती, महागाव. पांढरकवडा तालुका खरेदी विक्री समिती, पांढरकवडा. झरी-जामणी बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था, पाटण शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करताना आधारकार्ड, ७/१२ उतारा, पीकपेरा आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी प्रत्यक्ष उपस्थिती बंधनकारक आहे.असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी विजय गाढवे यांनी केले आहे.




