spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रतिबंधित मांजा तस्करी उघड; ३४.४० लाखांचा माल जप्त

कळमेश्वर :- दिनांक ०८/१२/२०२५ रोजी कळमेश्वर पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा गोंडखैरी, व्हि. आर. एल. लॉजीस्टिक यार्ड येथे कंटेनर कमांक जी जे २१ वाय ३३१८ यामध्ये प्रतिबंधीत नायलॉन मांजाची वाहतूक होत असुन सदरचे कंटेनर हे अनलोडींग करीता व्हि.आर.एल. लॉजीस्टिक, गोंडखैरी येथे उभे आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे कळमेश्वर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि उभ्या असलेल्या कंटेनर कमांक जी जे २१ वाय ३३१८ ची पंचासमक्ष तपासणी केली असता नमुद कंटेनर मध्ये बॉक्स मध्ये नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्रीमध्ये गुंडाळलेले मिळुन आले. आरोपीचे ताब्यातून एकुण १२०० नग नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्री किंमती १४,४०,०००/- रूपये तसेच कटेनर किंमती २०,००,०००/- रूपये असा एकुण ३४,४०,०००/- रूपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे. चालकाचे नाव विचारले असता आरोपी चालक नामे छविनाथ मोहन निशाद, वय ३० वर्ष, रा. विंध्याचल गाव, बसई कालन, राजापुर, जि. मिर्झापुर, राज्य उत्तर प्रदेश अशी माहीती प्राप्त झाली. त्याला नायलॉन मांझा कोठुन आणला याबाबत विचारना केली असता त्याने सांगितले की, नमुद प्रतिबंधीत नायलॉन मांजा हा सुरत, गुजरात येथुन लोड करून आणलेला आहे.

नमुद प्रकरणी आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन कळमेश्वरला कलम १२५, २२३ भा.न्या. सं. सहकलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.