spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस २४ ताासाच्या आत अटक

भिवापूर :- फिर्यादी नामे काजल राजु मारबते, वय २३ वर्ष, रा. पांजरेपार पुनर्वसन ता. भिवापुर जि. नागपुर यांनी पोलीस स्टेशन भिवापूर येथे तोंडी रिपोर्ट दिली की, पिडीता आचल व आरोपी नामे साहील रमेश रूईकर, रा. मांढळ ता. कुही जि. नागपुर हे पती पत्नी असुन त्यांचेमध्ये चारित्र्याचे संशयावरून वादविवाद सुरू होते. त्याचे जाचाला कंटाळुन पिडीता ही फिर्यादी यांचे घरी राहत होती. दिनांक ०८/१२/२०२५ रोजी पिडीता ही घरी हजर असता आरोपी हा आला व आरोपीने पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेवुन व तिला शिवीगाळी व वादविवाद करून चाकुने वार करून जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशा रिपोर्ट वरून कलम १०९ भा. न्या. सं. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नमुद आरोपी हा गुन्हा केल्यापासुन मिळुन येत नव्हता. भिवापूर पोलीस यांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदाराच्या मार्फतीने आरोपीचा शोध घेत अवघ्या २४ तासाच्या आत आरोपीचा शोध घेवुन त्याला दिनांक ०९/१२/२०२५ रोजी भंडारा जिल्हयातील मुरमाडी, येथून ताब्यात घेतले. नमुद आरोपीला अटक आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.