खापा :- महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये उपविभागिय दंडाधिकारी सावनेर यांनी पोलीस स्टेशन खापा अभिलेखावरिल आरोपी हर्षल प्रदीप मोहटे, वय २३ वर्ष, रा. डोंगेघाट खापा, ता. सावनेर जि. नागपूर याला नागपुर जिल्हयातुन हद्दपार केले आहे.
नमुद आरोपी याचेवर लोकांना मारपीट करणे, दंगा करणे, जबरीने हिसकावुन श्रेणे, जिवाने मारण्याची धमकी देणे यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहे. नमुद आरोपीचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी पोलीसांनी त्यांचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. परंतु आरोपी याने आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरूच ठेवली. सदर आरोपी हा गुन्हे करण्याच्या सवयीचे असल्याने तो अशा प्रकारचे गुन्हे करून सामान्य जनतेच्या मनात दहशत पसरवितात तसेच त्यांच्या कृत्यामुळे शांततेचा भंग होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आरोपींचा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ), (ब) अन्वये हद्दपार करण्याचा प्रस्ताव खापा पोलीसांनी उपविभागिय दंडाधिकारी, सावनेर यांचे कडे पाठविला असता त्यांनी प्रस्ताव मंजुर करून नमुद आरोपी हर्षल प्रदीप मोहटे, वय २३ वर्ष, रा. डोगेघाट खापा, ता. सावनेर जि. नागपूर यांस १ महिन्यांकरीता नागपुर शहर आणि नागपुर ग्रामीण येथुन हद्दपार केले.
नागपुर ग्रामीण जिल्हा पोलीसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नमुद आरोपी नागपुर जिल्हा हद्दीत दिसुन आल्यास नजिकच्या पोलीस स्टेशनला माहीती दयावी.




