केळवद :- केळवद पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, एक महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम. पी. -२८/ए.डी.-०५६० या वाहनाने पोस्टे केळवद हद्दीतील कवठा शिवारातील नाल्यातून अवैधरीत्या विनापरवाना रेती भरून येत आहे. अशा मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी मौजा केळवद येथील कवठा फाट्याजवळ नाकाबंदी केली असता एक महिंद्रा कपनीचा ट्रॅक्टर मिळून आला. महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम पी २८ ए डी ०५६० यास थांबवुन वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळून आली. वाहन चालक आरोपी नामे अभय गोविंदा सरोदे, वय २३ वर्ष, रा. वार्ड क्र. ०५, तेली मोहल्ला केळवद ता. सावनेर जि. नागपूर याला रेती वाहतूकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याबाबत सांगितले, घटनास्थळाहुन पोलीसांनी पंचासमक्ष १) महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम पी २८ ए डी ०५६० किमती ३,००,०००/- रू. तसेच त्या ट्रॅक्टरला विना नंबर नसलेली ट्रॉली किंमती १,००,०००/-रु. २) १ ब्रास रेती किंमती ६०००/- रूपये ३) एक अॅडरॉइड मोबाईल किंमत्ती १०,०००/- रू. असा एकूण ४,१६,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नमुद आरोपी वाहन चालक अभय गोविंदा सरोदे, वय २३ वर्ष, रा. वार्ड क्र. ०५, तेली मोहल्ला केळवद ता. सावनेर जि. नागपूर याच्या विरूध्द पोस्टे केळवद येथे कलम ३०३(२) भा.न्या.सं २०२३, सहकलम ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम ४, २१ खाण खनिज अधिनियम, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालक अभय गोविंदा सरोदे यास अटक करण्यात आली आहे.




