Home Latest News परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

0

<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> राष्ट्रीय परीक्षा एजन्सी &lpar;NTA&rpar;&comma; नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित NEET &lpar;UG&rpar;-2026 ही परिक्षा गडचिरोली येथील शिवाजी हायस्कुल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय&comma; गोकुळ नगर&comma; गडचिरोली&comma; शिवाजी महाविद्यालय&comma; धानोरा रोड&comma; गडचिरोली&comma; शासकीय विज्ञान महाविद्यालय&comma; चामोर्शी रोड कन्नमवार नगर&comma; गडचिरोली&comma; शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय&comma; एम&period;आय&period;डी&period;सी रोड इंदाळा&comma; गडचिरोली&comma; महिला महाविद्यालय रेव्हेन्यु कॉलोनी&comma; हनुमान नगर&comma; चंद्रपूर रोड&comma; गडचिरोली या परक्षिा केंद्रावर दिनांक 21 जुन 2026 रोजी दुपारी 2&period;00 ते 5&period;15 वाजताच्या कालावधीत घेण्यात येणार आहे&period; परिक्षा केंद्रावर परिक्षा शांततेच्या वातावरणात पार पडतील व तेथील परिक्षार्थींना तणावमुक्त वातावरणात परिक्षा देणे शक्य होईल अशी व्यवस्था करावी म्हणून सदर परिक्षा केंद्रांच्या परिसरात 200 मीटर अंतरापर्यंत भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे कलम 163 अन्वये मनाई हुकुम जारी करणे हे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता आवश्यक झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी&comma; अविश्यांत पंडा यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये सदर परिक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टीने सदर परिक्षा केंद्राच्या 200 मिटर अंतरापर्यंत पुढीलप्रमाणे बाबी&sol;कृत्ये करण्यास मनाई आदेश जारी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>निषिद्ध क्षेत्रात झेरॉक्स मशीन&comma; फॅक्स व एस टी डी बुथ&comma; इत्यादी माध्यमे परिक्षा कालावधीत सुरु राहणार नाही&period; परिक्षा केंद्रात व परिसरात मोबाईल फोन&comma; लॅपटॉप&comma; पेजर&comma; टेपरेकॉर्डर&comma; कॅमेरा इत्यादींचा वापर करता येणार नाही&period; निषिद्ध क्षेत्रात नारेबाजी करणे&comma; गाणी म्हणणे&comma; वाद्य वाजविणे&comma; भाषण करणे&comma; घोषणा करता येणार नाही&period; पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाहीत&period; शस्त्र&comma; सोटे&comma; तलवारी&comma; भाले&comma; बंदुका&comma; सुरे&comma; काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल&comma; अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर ठेवता येणार नाही&period; कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेता येणार नाही&period; परिक्षा केंद्रापासून 200 मीटर अंतरावर चुन्याची लाईन आखण्यात यावी&period;<&sol;p>&NewLine;<p>सदर आदेश कर्तव्य बजावणारे वरिष्ठ अधिकारी&comma; आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना लागू राहणार नाही&period; पोलीस अधिक्षक&comma; गडचिरोली यांनी परिक्षेच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करून आवश्यक पोलीस बंदोबस्त लावण्याची कार्यवाही व जबाबदारी पार पाडावी&period; सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध फौजदारी नियमांतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल&period; सदर अधिसूचना परिक्षेच्या दिनांकास 21 जुन 2026 दुपारी 12&period;00 वाजेपासून ते सायंकाळी 06&period;00 वाजेपर्यत अमलात राहील असे जिल्हादंडाधिकारी&comma; गडचिरोली अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version