spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तत्परता, वेळीच आणि योग्य उपचारामुळे अवघ्या दीड महिन्याच्या चिमुकल्याची वाचली दृष्टी

गडचिरोली :- अवघ्या १.५ महिने वयाच्या मुदतपूर्व (Premature) जन्मलेल्या बालकावर नागपूर येथे यशस्वी उपचार करून त्याची दृष्टी वाचवण्यात आरोग्य विभागातील डीईआयसी (जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र) ला यश आले आहे. केवळ १.०५ किलो वजनाच्या या बालकाने मृत्यूशी आणि अंधत्वाशी दिलेली झुंज डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या योग्य नियोजनामुळे यशस्वी ठरली आहे.

नेमकी घटना – 

जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे (Preterm & Low Birth weight)कमी दिवसाचे आणि कमी वजनाचे संबंधित बालक गेल्या दीड महिन्यापासून एसएनसीयु अतिदक्षता विभागात (SNCU) उपचार घेत होते. कमी दिवसाचा म्हणजे आईच्या पोटात नऊ महिने पूर्ण न घेता सहाव्या महिन्यातच मुदतपूर्व जन्मामुळे अशा बालकांमध्ये ROP (Retinopathy of Prematurity) म्हणजेच डोळ्यांच्या पडद्याचा गंभीर आजार होण्याची शक्यता असते. डीईआयसी मार्फतीने नियमित होणारया आरओपी तपासणी मध्ये या बालकाची रेटीना तज्ञ डॉ. अंकिता अप्पलवार यांनी वेळोवेळी डोळ्यांची तपासणी (ROP Screening) केली. बाळाच्या जन्मापासून तब्बल ७ वेळा ही तपासणी करण्यात आली. दुर्दैवाने, प्रत्येक तपासणीत बाळाच्या डोळ्यांची परिस्थिती खालावताना दिसत होती आणि बाळ ‘ROP Positive’ आढळले.

आव्हानात्मक परिस्थितीत 

बाळाला तातडीने उच्च उपचारांची गरज होती, परंतु प्रकृती स्थिर नसल्यामुळे त्याला मोठ्या केंद्रात (Higher Centre) हलवणे धोक्याचे होते. अखेर २० फेब्रुवारी २०२६ रोजी बालरोग तज्ञ डॉ.प्रशांत पेंदाम यांना बाळाची प्रकृती स्थिर झाल्याचे लक्षात येताच, बाळाला डीईआयसी व एसएनसीयु मार्फतीने विलंब न लावता उच्चस्तरीय विशेषज्ञ सेवेकरिता संदर्भित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

असे वाचले डोळे

बाळाची प्रकृती स्थिर होताच, डीईआयसी च्या ऑप्टोमेट्रिस्ट नम्रता मुंजमकर यांनी बाळाला सुरक्षितपणे नागपूरला नेण्याची जबाबदारी पार पाडली व डीईआयसी करिता तृतीयस्तरीय संदर्भसेवेसाठी राज्य स्तरावरून सामंजस्स करार असलेले सारक्षी नेत्रालय नागपूर येथे हलवण्यात आले. तिथे डोळ्याच्या रेटीना शल्य चिकित्सक तज्ञ डॉ. शिल्पी नारनवरे यांनी बाळाच्या डोळ्यांवर योग्य ते उपचार करून त्याची दृष्टी वाचवण्यात यश मिळवले.

बाल सुखरूप एसएनसीयु मध्ये परत आला असून आज दि २७ फेब्रु रोजी डीईआयसी मार्फतीने नियमित होणारया आरओपी तपासणी मध्ये सदर बालकाचे दोन पाठपुरावे पूर्ण झाले व बाळाचे डोळे व्यवस्थित आहेत आणि पुढील पाठपुरावा डीईआयसी कडून होणार आहे.

आरोग्य पथकाचे कौतुक 

वेळेवर झालेले निदान व मिळालेल्या उपचार यामुळे या बालकाची दृष्टी वाचविल्याने बाळाचे निश्चितच भविष्य उजळनार आहे. या यशस्वी कामगिरीमागे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.उईके मॅडम, वैद्यकीय अधीक्षक डॉ माधुरी कीलनाके यांचे मार्गदर्शन लाभले आहे. डीईआयसी सोबतच एसएनसीयु तील शैला सिस्टर, अधिपरिचारिका प्रमुख पूजा सागोरे इत्यादीसह मोलाचे सहकार्य लाभले आहे. करिता संपूर्ण वैद्यकीय पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“मुदतपूर्व जन्मलेल्या मुलांमध्ये डोळ्याच्या आरओपी (रेटिनोपथी ऑफ प्रीमचुरीटी) चा धोका असतो. योग्य वेळी स्क्रीनिंग आणि वेळेत उपचार मिळाल्यास अंधत्व टाळता येते, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”

DEIC: जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र 

शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये DEIC केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांच्या पुढील तपासणी/उपचार, विशेष चाचण्या, निदान निश्चिती, उच्च स्तरीय विशेषज्ञ सल्ला/सेवा, शस्त्रक्रिया इत्यादीकरिता “द्वितीयस्तरीय संदर्भसेवा कक्ष” म्हणून डीस्ट्रीक्त अर्ली इंटरवेन्शन सेंटर (डीईआयसी), जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे स्थापित असून यामध्ये वेळीच व गरजेनुसार द्वितीयस्तरीय तथा तृतीयस्तरिय आरोग्य सेवा प्रदान करण्यात येते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.