spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वयाचा पुरावा देणे आवश्यक 18 नोव्हेंबरला निवृत्तीवेतनधारकांची त्रैमासिक सभा

नागपूर :- मूळ निवृत्तीवेतन धारकांचे मृत्यु पश्चात जे कुटूंब निवृत्तीवेतनाचा लाभ घेत असतील, अशा कुटूंब निवृत्तीवेतन धारकांचा वयाचा पुरावा नसल्याने वयाचे 80 वर्षानंतर द्यावयाच्या 20 टक्के अतिरितक्त निवृत्तीवेतनाच्या लाभ देणे शक्य होत नाही, अशा कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी वयाचा पुरावा (आधारकार्ड व्यतिरिक्त) त्यांचे पॅन कार्ड/पासपोर्ट/शाळा सोडल्याचा दाखला किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वया बाबातचे प्रमाणपत्र जिल्हा कोषागार कार्यालय नागपूर येथे सादर करण्याचे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी केले आहे.

निवृत्ती वेतन धारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांच्या अडचणी संबंधाबाबतचे निवारणक व त्यावरील समाधान याबाबत निवृत्तीवेतन धारकांची त्रैमासिक सभेचे आयोजन दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी वरिष्ठ कोषागार कार्यालय यांच्या सभागृहात सकाळी 11 वाजता करण्यात आलेले आहे. या बैठकीत निवृत्तीवेतन धारकांच्या काही अडचणीचे समाधान करण्यात येईल त्याच बरोबर निवृत्तीवेतन धारकांचे दृष्टिने निवृत्तीवेतन वाहिनी या संगणकीय प्रणालीतील उपलब्ध सुविधा या त्याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येईल. ज्या निवृत्तीवेतन धारकांच्या काही अडचणी असतील तर त्यांनी दिनांक 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत कोषागार कार्यालयात लेखी स्वरूपात सादर कराव्या.

मूळ निवृत्तीवेतनधारकांच्या मृत्यु पश्चात कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना लाभ मिळण्यास येत असलेल्या अडचणीबाबत दिलासा देण्यासाठी कोषागाराकडून कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना वयाचा पुराव्याबाबत प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन प्रभारी वरिष्ठ अधिकारी मोनाली भोयर यांनी केले आहे. तसेच सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी कोषागार कार्यालयात त्रैमासिक सभेचे 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

Popular Articles