spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मेडिकल चौक येथे राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळा उभारण्यात यावा आक्रमण केले धरणा आंदोलन.

नागपूर २७ – 26 जून 2025 मेडिकल चौक येथे आक्रमण युवक संघटना तर्फे राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या 151 व्या जयंती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजीत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल या पुस्तकाचे लेखक व पत्रकार मिलिंद किर्ती मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थिती  होते.  त्याच सोबत सामाजिक कार्यकर्ता पूजाताई नाखले, अलकाताई माटे रवींद्र पाटील, आक्रमण चे जिल्हा संयोजक ओपूल तामगाडगे, कार्याध्यक्ष विशाल बनसोड व जिल्हाध्यक्ष धनराज हाडके उपस्थित होते. सर्व प्रथम शाहू महाराजांच्या फोटोला फुलांचा माल्यार्पण करून कार्यक्रमाचे सुरुवात झाली. सुरुवातीला समाज प्रबोधनकार अविनाश साखरकर यांनी आंबेडकरी आंदोलनावर गीत गायन करून वातावरण पेटवले, कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मिलिंद कीर्ती यांनी आपल्या प्रमुख भाषणामध्ये बोलताना राजश्री छत्रपती शाहू महाराज हे   बहुजनांचे राजे होते त्यांनी आपल्या संस्थानात सर्वप्रथम ५० टक्के आरक्षण देऊन सामाजिक न्याय देण्याचे काम केल. शाहू महाराजांनी माणगावच्या परिषदेमध्ये दलितांनी आपला नेता निवडला असून बाबासाहेब आंबेडकर आपला उद्धार एक दिवस करतील असे भाकीत शाहू महाराजांनी केले होते, शाहू महाराजांनी आपल्या राजवटीत अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्था व, हॉस्पिटल तयार केले होते. त्यामुळे देशाला आज खरी गरज शाहू महाराजांच्या कार्याची विचारांची आहे. आक्रमण संघटन हे लढवय संघटन असून अनेक असे अन्याय अत्याचार पीडित शोषित त्यांच्या पाठीमागे उभे राहणारे संघटन असून आक्रमण द्वारे मेडिकल चौक या ठिकाणी शाहू महाराजांच्या पुतळा उभारण्यात यावा या मागणीचे समर्थन सुद्धा त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.

आक्रमणच्या सर्व कार्यकर्त्यांनी नारे निर्देशन घोषणा देऊन शाहू महाराजांच्या पुतळा मेडिकल चौकात लवकरात लवकर उभारण्यात यावा अन्यथा येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानभवनाचा घेराव करून मुख्यमंत्री व खासदार यांच्या रस्ता रोको आंदोलन करण्याच्या इशारा आक्रमणे या कार्यक्रमात दिला.

कार्यक्रमाच् सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष धनराज हाडके यांनी केले तर प्रास्ताविक ओपुल तामगाडगे यांनी मांडले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता जिल्हा उपाध्यक्ष रोशन ठवरे, शहर उपाध्यक्ष प्रफुल खोब्रागडे, जिल्हा कोषाध्यक्ष सुरज पुरानिक, जिल्हा सचिव अश्विन पाटील, समीर शाहू, अतिश शंभरकर,आदेश रामटेके ऋषी धोलारे, दीपक पाटील विकी वानखेडे, सनी शेंडे, दर्शन तामगाडगे, सुंदरजी भालावी, पंकज टवरे, श्रीकांत फुले, इत्यादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जयंती व धरणा प्रदर्शन कार्यक्रम पार पडला, शेवटी सर्वांचे  आभार मीडिया प्रभारी झब्बु तामगाडगे यांनी मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.