spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेर परिसरातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला द्या – सरपंचा लुंबिनी महेश कलारे

किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यात चाचेर, नेरला परिसरात व शेत शिवारात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने,शेतकऱ्यांचा शेतात जाऊन पडलेल्या गव्हाची पाहणी भाजपा किसान आघाडी जिल्हा नागपूर रामटेक ग्रामीण मंत्री विनोदराव कोपरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. याप्रसंगी चाचेर सरपंचा लुंबिनी महेश कलारे , दत्तु बरबटे, गोविंद बादोले,विलास कोपरकर, वामन भेंडे,गंगाधर बादोले,हर्षद बरबटे,अमर अडकने, परिसरातील शेतकरी उपस्थित होते. पाहणी केल्यानंतर संबंधित विभागाने तातडीने सर्वे करून शेतकऱ्यांच्या झालेल्या शेत पीक नुकसानीचा आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणी चाचेर सरपंचा लुंबिनी महेश कलारे सह विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Popular Articles