spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ दुरुपयोग व बेकायदेशीर तस्करी विरोधी दिनानिमित्त जनजागृती बैठक संपन्न

कामठी :- आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ दुरुपयोग व बेकायदेशीर तस्करी विरोधी दिन (26 जून) निमित्त नवीन कामठी पोलीस ठाण्यात जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत नगरपरिषद कामठी येथील नगरसेवक व नगरसेविकांनी सहभाग घेतला.

संयुक्त राष्ट्र संघाच्या आवाहनानुसार आयोजित या बैठकीत परिमंडळ-6, नागपूर शहरचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप पखाले यांनी अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्ती, अमली पदार्थांची विक्री व तस्करी रोखण्यासाठी नागरिकांची भूमिका, युवकांचे संरक्षण आणि समाजात जनजागृती वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले.

बैठकीत अमली पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्ती, कुटुंब व समाजावर होणारे दुष्परिणाम, अमली पदार्थांची विक्री, साठवणूक व तस्करीविरोधातील पोलीस प्रशासनाची कार्यवाही, “ऑपरेशन थंडर” अंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, शाळा-महाविद्यालयांमधील जनजागृती कार्यक्रम तसेच युवकांसाठी समुपदेशन व पुनर्वसन सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी नागरिकांनी अमली पदार्थांच्या विक्री व सेवनाबाबतची माहिती पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवून अमली पदार्थमुक्त समाज निर्मितीसाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.

या बैठकीस सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर ,प्रभारी पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे ,गुप्त विभागाचे अखिलेश ठाकुर तसेच नगरपरिषद कामठीचे नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

“व्यसनमुक्त युवक – सुरक्षित समाज” आणि “अमली पदार्थांना नकार द्या, उज्ज्वल भविष्याला स्वीकारा” हा संदेश यावेळी देण्यात आला.

Popular Articles