spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तहसीलदार गणेश जगदाळे यांनी चक्क रेतीघाटावर केला योग; आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिला आरोग्याचा संदेश

कामठी :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कामठीचे तहसीलदार गणेश जगदाळे यांनी कामठी तालुक्यातील बिना रेतीघाटावर उपस्थित राहून योगासने करत निरोगी जीवनाचा संदेश दिला. निसर्गरम्य वातावरणात योगाभ्यास करत त्यांनी उपस्थितांना नियमित योग करण्याचे आवाहन केले.

यावेळी तहसीलदार गणेश जगदाळे म्हणाले की, योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मोठी मदत होते. बदलत्या जीवनशैलीत तणावमुक्त आणि निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करणे आवश्यक आहे.

रेतीघाटासारख्या वेगळ्या ठिकाणी योग दिन साजरा करण्याच्या या अनोख्या उपक्रमाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली असून, तहसीलदारांच्या या अभिनव उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करीत तहसीलदाराचे कौतुक करण्यात येत आहे. तहसिलदार गणेश जगदाळे हे दैनंदिन सकाळी योगा करतात त्यानुसार रविवार सुट्टीचा दिवस त्यातच आज 21 जून जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून नदी काठावरील निसर्गरम्य भागात योगा करण्याचा मानस डोक्यात आणून बिना भागाकडे गेले असता तिथे अवैध वाळू वाहतूक होताना दिसताच वाहनावर धाड घालून 8 ब्रास वाळू वाहनासह जप्त करून कार्तव्यदक्ष भूमिका साकारली .सोबतच त्याच ठिकाणी रेती घाटावर योगा करून जागतिक योगा दिन पाळला.

Popular Articles