spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

150 दिवसाच्या  इ- गव्हर्नन्स सुधार कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यात प्रथम

– सेवाविषयक सुधारणांमध्ये नागपूर प्रादेशिक विभागाची उल्लेखनीय कामगिरी

नागपूर :- इ – गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यात राबविण्यात आलेल्या 150 दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासकीय सुधारणा, पारदर्शक व गतिमान होण्याच्या दृष्टीने राबविलेल्या विविध कार्यक्रमांची राज्यस्तरावर दखल घेतली आहे. यामध्ये नागपूर प्रादेशिक विभागात झालेल्या विशेष कामगिरीची बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागाला विशेष पारितोषक देऊन गौरव केला आहे.

इ- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत नागपूरप्रादेशिक विभागात आठ ऑनलाइन सेवा पैकी सात सेवा सर्वसामान्य नागरिकांना विहित मुदतीत पुरविण्यात आलेल्या आहेत, यामध्ये मुख्यमंत्री डॅशबोर्ड, आपले सरकार इंटिग्रेशन व्हाट्सअप इंटिग्रेशन प्रादेशिक विभागात सुरू करण्यात आले आहे. लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत लोकाभिमुख व पारदर्शक तसेच गतिमान होण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने यांनी यावेळी दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत आहे झाडाचे संगोपन व संरक्षणासाठी शासनाने ट्री ॲप मॉनिटरिंग प्रणाली तयार केली आहे. या प्रणालीच्या नियंत्रणाची संपूर्ण जबाबदारी नागपूर प्रादेशिक विभागावर सोपविण्यात आली आहे त्यामुळे वृक्षारोपण तसेच संगोपनालाही प्राधान्य देण्यात आले आहे. वृक्षारोपणासाठी ही उत्कृष्ट प्रणाली असून तिचा वापर वृक्षारोपणापासून तर वृक्षाच्या संगोपनापर्यंत होत आहे.

प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांची जेष्ठता सूची अद्यावत करणे व रिक्त पदांची भरती करणे याला प्राधान्य देण्यात आले असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तृतीय वर्गातील 75 पैकी 60 पदे भरण्यात आली आहे तसेच सरळ सेवा भरतीने बिंदू नामावलीनुसार अनुकंपा गटातील रिक्त पदाची भरती 100% करण्यात आली आहे. आय- गॉट प्रशिक्षणांतर्गत 1हजार 600 अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी 1हजार 540 अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून महापार कार्यक्रमांतर्गत शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागासंदर्भात असलेल्या सर्व तक्रारी ई-गव्हर्नरच्या माध्यमातून नोंदविण्यात येत असून डिसेंबर अखेरपर्यंत 407 तक्रारी पैकी 405 तक्रारी सोडविण्यात आले आहे. पीजी पोर्टल प्रणालीवर 179 तक्रारी प्राप्त झाल्या असून 178 तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे.

इ गव्हर्नन्स प्रशासकीय सुधारणा व जनतेच्या तक्रारींचा निपटाला आदी सुधारणांमध्ये नागपूर प्रादेशिक विभागातर्फे राज्यात उल्लेखनीय कार्य झाले असून यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर चंद्रपूर वर्धा, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील कार्यालयात ई गव्हर्नन्स प्रमाणे प्रभावीपणे राबविण्यात आले असल्याची माहिती ही मुख्य अभियंता संभाजीराव शिंदे यांनी यावेळी दिली.

Popular Articles