spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती उत्साहात साजरी

नागपूर :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती, हुडकेश्वर रोड, नागपूर यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती रविवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व महादेवराव पातोंड यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे अभिषेक, पूजन व आरतीने झाली. यानंतर अहिल्यादेवींच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. पर्यावरण व इंधन बचतीचा संदेश देत यावर्षी वाहन रॅलीऐवजी पायदळ जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. समाजातील महिला, युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

सायंकाळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, आमदार कृपाल तुमाने, महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हातीबेड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समितीचे सचिव महादेवराव पातोंड यांनी प्रास्ताविकातून समाजाच्या विविध मागण्या मांडल्या. महापौर निता ठाकरे यांनी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. दीपक कापडे व नेहा लोही यांनी केले, तर आभार प्रदर्शन राम सोनाग्रे यांनी मानले. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.

Popular Articles