spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कुरेशी समुदायाचा गुरेढोरे खरेदी विक्री वर बहिष्कार

कामठी ता  २९ :- कामठी तालुक्यातील कुरेशी समुदायाने अलीकडच्या आपल्यावरील अन्यायकारक घटनेच्या वाढीव मुळे गुरेढोरे खरेदी विक्री वर बहिष्कार टाकला असून या निर्णयामुळे कामठी तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. कुरेशी समुदायाच्या म्हणण्यानुसार त्यांनी सर्व कायदेशीर  कागदपत्रांसह गुरेढोरे खरेदी विक्री करत असताना काही संघटनांकडून सातत्याने त्रास दिला जात आहे.पोलीस प्रशासनाकडूनही कोणतीही ठोस मदत मिळत नसल्याने आम्ही दाद मागावी तरी कुठे ?असा प्रश्न उभा होऊन ठाकला आहे.आमच्याकडे प्रत्येक व्यवहाराचे पावती दाखले असूनही आम्हाला गुन्हेगार ठरवले जाते .विनाकारन छळ केल्या जाते. या परिस्थितीमुळे कुरेशी समाजाने स्वताच्या सुरक्षेसाठी व अन्याया विरोधात आवाज उठविण्यासाठी कुरेशी समुदायाकडून गुरेढोरे खरेदी विक्री वर बहिष्कार टाकला आहे. सध्या शेतीच्या कामासाठी बी बियाणे खरेदी किंवा घरखर्च भागवण्यासाठी कमकुवत असलेले अनेक शेतकरी आपली गुरेढोरे बाजारात विकण्यासाठी आणतात मात्र कुरेशी समुदायांच्या व्यवसायिकांनी खरेदी विक्री बंद केल्यामुळे बाजारात व्यवहार ठप्प पडला आहे.तेव्हा प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्षात घेत योग्य समाधान करून परिस्थिती निवडण्याची विनंती करीत ऑल इंडिया जमैतूल  कुरेश संघटना कामठी च्या वतीने तहसीलदार ला सामूहिक निवेदन देण्यात आले

Popular Articles