spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रमानगर रेल्वेचौकीच्या अलीकडील भाग प्रभाग क्र 14 मध्ये पूर्वीप्रमानेच समाविष्ट करण्याची वंचीत बहुजन आघाडी ची मागणी

 

वंचीत बहुजन आघाडी चे तहसीलदारला सामूहिक निवेदन सादर

कामठी ता २९ :- आगामी होऊ घातलेल्या कामठी नगर परिषद निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर कामठी नगर परिषद च्या वतीने नुकताच प्रभाग रचनेचा मसुदा जिल्हाधिकारी कडे सादर करण्यात आला असून येत्या काही दिवसातच प्रारूप प्रभाग रचना सादर करण्यात येईल तत्पूर्वी प्रभाग क्र 15 मध्ये प्रभाग क्र 14 च्या लगत असलेला रमानगर रेल्वे फाटक चा अलीकडील भाग समाविष्ट केला होता व यापूर्वी त्या आधारे निवडणूक ही झाली होती मात्र प्रभाग क्र 15 मध्ये रमानगर रेल्वे फाटक च्या अलीकडील काही भाग समावेशक असल्याने या परिसराचा अपेक्षित तसा विकास झालेला नाही त्यामुळे पूर्वी प्रमाणेच रमानगर रेल्वे फाटक अलीकडील असलेला यादी भाग क्र 72 मध्ये समावेश असलेला चौरे च्या घरापासून ते सम्यक बुद्ध विहार ,यादव यांच्या घरापर्यंत संपूर्ण भाग प्रभाग क्र 14 मध्ये समावेश करण्यात यावे या मागणीसाठी आज कामठी शहर वंचीत बहुजन आघाडी च्या वतीने तहसीलदार गणेश जगदाडे यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले तसेच मागणी पूर्ण न झाल्यास प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन पुकारणार असल्याचा ईशारा सुद्धा या निवेदनातून देण्यात आला.
याप्रसंगी वंचीत बहुजन आघाडी चे कामठी शहर अध्यक्ष दीपक वासनिक, उपाध्यक्ष अविनाश गजभिये, माजी नगरसेवक दादा कांबळे, महासचिव राजेश ढोके,सचिव अजय मेश्राम,रवी वानखेडे,नितेश नागदेवे,नरेश वाघमारे, विदेश डोंगरे आदी उपस्थित होते..

Popular Articles