spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शेंबाळपिंपरीत बनावट देशी मद्यसाठ्यावर छापा

Ø राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

Ø दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; तीन आरोपी अटकेत

यवतमाळ :-  पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुसद-1 विभागाने बनावट देशी मद्य निर्मिती व विक्री प्रकरणी मोठी कारवाई करत सुमारे 2 लाख 2 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 16 फेब्रुवारी रोजी गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे शेंबाळपिंपरी, ता. पुसद, जि. यवतमाळ येथील एका किरकोळ देशी दारू दुकानात बनावट मद्य तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुसद-1 विभाग यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारू तसेच त्याच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले.

कारवाईदरम्यान 90 मि.ली. आणि 180 मि.ली. क्षमतेचे बनावट देशी दारूचे बॉक्स, बनावट लेबल, ओरिजिनल लेबल, बनावट बुच (झाकण), एक मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 2 लाख 2 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हे बनावट मद्याचे सेवन केल्याने लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो तसेच शासनाच्या महसुलाचे खूप मोठे नुकसान होते. त्यामुळे या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्ह्या दाखल करून आरोपीना जागीच अटक करुन आरोपीस दोन दिवसांची एक्साईज मिळाली आहे.

ही कार्यवाही आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उप-आयुक्त पराग नवलकर, अधीक्षक नितेश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक अनिल पिकले, सुकेशनी शिंदे, जवान पंजाब राठोड, महेंद्र रामटेके, वाघजी बोंबले, पुनम गटलेवार, प्रतिक कौटुरवार यांनी यशस्वीरित्या पार पडली असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक अनिल एन. पिकले करीत आहेत.

राज्य उत्पादन शुल्क, यवतमाळ यांनी सर्व जनतेस असे आवाहन केले की, अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या बाबत कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल क्रमांक १८००८३३३३३३ व व्हाटसअॅप क्रमांक ८४२२००११३३ या वर संपर्क करावा. माहिती/खबर सागंणाऱ्या व्यक्तीचे नावे गोपनिय ठेवल्या जाईल, असे आवहन करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.