राजेश तांडेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या झेंडा घेतला हाती…

0
56

तिरोडा :- येथील स्थानिक जनसंपर्क कार्यालयात येथे आयोजित विशेष कार्यक्रमात राजेश तांडेकर यांनी युवा नेते रविकांत बोपचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रासंगिक पक्षाचा दुपट्टा घालून रविकांत बोपचे यांनी पक्षात विधिवत स्वागत केले. पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांचे पक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले.

या वेळी बोलताना राजेश तांडेकर यांनी सांगितले की, “पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आणि समाजहितासाठी काम करण्याच्या हेतूने मी हा निर्णय घेतला आहे. पुढील काळात जनतेच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहून काम करणार आहे.”

प्रासंगिक नासिर घाणीवाला, आशिष येरपुडे, विजय बुद्धे, जॉनी सैय्यद आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.