Home Latest News कृष्णा डान्स स्टुडिओ द्वारे तिरोडा रास गरबा महोत्सव

कृष्णा डान्स स्टुडिओ द्वारे तिरोडा रास गरबा महोत्सव

0
56

तिरोडा :- येथील प्रेम बंधन लॉन गंज बाजार येथे २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर ला रास गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

भव्य तिरोडा रास गरबा महोत्सव तिरोडा येथे चौथ्यांदा होणार आहे. हा गरबा महोत्सव तिरोडा येथे आयोजित केलेला सर्वात मोठा आणि सर्वात नेत्रदीपक कार्यक्रम मानला जाणार आहे. या तिरोडा रास गरबा महोत्सवात सर्व स्तरातील, धर्मातील आणि संघटनांच्या लोकांना एकत्रितपणे गरबा सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान चालेल आणि संपूर्ण तिरोडा उत्सवाच्या वातावरणात आणेल. हा कार्यक्रम आणखी भव्य करण्यासाठी आयोजक प्रयत्नशील आहेत. त्याकरिता आयोजक कृष्ण नेवारे मो.९३५९५५१६१६ ,प्रेम कनोजे मो. ९३७३३५५५३५,यश मकोडे मो. ९३७३३५५५३५, संपर्क साधावे .असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

फाईल फोटो