नागपूर :- भारत माता चौक, आशीर्वाद नगर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात बुधवारी, दि. २ सप्टेंबर रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. आशीर्वाद योग नृत्य परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांनी शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे सिद्धूजी कोमजवार यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा स्नेहबंध अधिक दृढ केला. रक्षाबंधन हा भाऊ- बहिणीच्या प्रेम, आपुलकी, विश्वास आणि संरक्षणाच्या नात्याचे प्रतीक मानला जातो. याच भावनेतून आशीर्वाद योग नृत्य परिवारातील महिलांनी सिद्धूजी कोमजवार यांना राखी बांधून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सुख, समृद्धी, आरोग्य आणि यशाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित महिलांनी सांगितले की, सिद्धू कोमजवार हे नेहमीच आपल्या सर्व बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी मदतीसाठी पुढे येण्याचा त्यांचा स्वभाव असून, त्यांच्या या आपुलकीच्या नात्यामुळे महिलांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास व जिव्हाळा निर्माण झाला आहे. राखीच्या पवित्र धाग्यातून हा विश्वास आणि प्रेम अधिक दृढ झाले. राखी बांधल्यानंतर सिद्धू कोमजवार यांनी उपस्थित सर्व भगिनींचे आभार मानत, त्यांच्या सुख- दुःखात आणि अडचणीच्या काळात सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे वचन दिले. या भावनिक क्षणी उपस्थित महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाला सिद्धू कोमजवार यांच्या पत्नी आशा कोमजवार यांच्यासह वंदना प्रकाश अहेरे, विनिता अव्हाडकर, ललिता खडगी, अर्चना भद्रे, नवनीत सौन्दी, तारा वंजारी, लता सूर्यवंशी, छाया कुरवाडे, निर्मला लिंमजे, सोनाली सिरसाम, प्रणिती धांडे, विजया दिवे, स्मिता जगताप,जयश्री कोहळे, कुंदा आदमने, दर्शना गोस्वामी, मनीषा चौधरी, वर्षा आदमने आदी महिला उपस्थित होत्या. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून केवळ सणाचा आनंद साजरा न करता महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधील बहीण- भावाचे प्रेम, विश्वास, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
भारत माता चौक येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधन साजरा


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.




