spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नगर परिषद, पंचायत निवडणुकीत राष्ट्रीय मराठा पार्टीचा भाजपाला पाठिंबा

– पक्षाचे अध्यक्ष अंकुश पाटील होनाळीकर यांची माहिती

मुंबई  :- आगामी नगर परिषद आणि नगर पंयाचत निवडणुकीत राष्ट्रीय मराठा पार्टीने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला असल्याची माहिती राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुश शिवाजी पाटील होनाळीकर यांनी बुधवारी दिली. याबाबतचे पत्र पाटील होनाळीकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगर परिषदा व नगर पंचायतींचा विकास करण्यासाठी आपण भाजपाला पाठिंबा देत असल्याचे पाटील होनाळीकर यांनी नमूद केले.

यावेळी पाटील होनाळीकर यांनी मराठा समाजाला ओबीसीतून हैदराबाद/सातारा गॅझेटियर नुसार ओबीसी आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य मंत्रीमंडळाचे आभार मानले. आगामी नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमध्ये भाजपाला विजय मिळवून देण्यासाठी काम करू असे आश्वासनही त्यांनी दिले. पक्षाचे उपाध्यक्ष प्रेमानंद वाघमारे, परमेश्वर देशमुख, सुरेंद्र कर्डिले, किशोर गाडे पाटील यावेळी उपस्थित होते.

Popular Articles