Home Latest News राऊतांनी राजकारण सोडून मनोरंजक वेबसीरीजची पटकथा लिहावी

राऊतांनी राजकारण सोडून मनोरंजक वेबसीरीजची पटकथा लिहावी

0

<p><strong>&&num;8211&semi; भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची खोचक टिप्पणी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;- <&sol;strong>अजित पवार स्वगृही परतण्यासाठी इच्छुक होते असे बिनबुडाचे वक्तव्य करणारे संजय राऊत हे जाणूनबुजून एखाद्या रहस्यमय&comma; मनोरंजक वेबसीरीजप्रमाणे चटपटीत पटकथा लिहून खोटी माहिती पसरवत आहेत&period; अजित पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्ये करणा-या राऊतांनी याबाबत ठोस पुरावे सादर करावेत असे खुले आव्हान भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी दिले&period; खासदारकी भूषवत खोटे आरोप करण्याची सवय जडलेल्या राऊतांनी खासदारकी व राजकारण सोडून ओटीटीसाठी दिग्दर्शन&comma; पटकथा लेखन करावे म्हणजे राऊतांचे दुकान चालेल अशी बोचरी टीकाही बन यांनी केली&period; अजितदादा स्वगृही परतण्यासाठी इच्छुक कधीच नव्हते&period; मात्र ते इतर घटकांना एनडीएमध्ये सामील करण्यासाठी प्रयत्नशील होते का हे देखील पहावे लागेल अशी पुस्ती बन यांनी जोडली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>राऊतांना जळी&comma; स्थळी&comma; काष्ठी&comma; पाषाणी ऑपरेशन लोटस दिसते<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>अजित पवारांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग अशी हिणकस टीका भाजपावर करण्याआधी याबाबत ठोस पुरावे सादर करावेत&period; उगाच हवेत बाण सोडायचे काम करू नये असे म्हणत बन यांनी राऊतांवर कोरडे ओढले&period; भूकंप&comma; त्सुनामि&comma; पूर आला तरीही राऊत यांना यात ऑपरेशन लोटस दिसते हे हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>अजित पवार यांच्या विमानाचा अपघातच<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>अजितदादांचा विमान अपघात हा अत्यंत दुर्दैवी होता&period; केंद्र सरकार आणि राज्य सरकार विमान अपघाताची चौकशी करत असून या चौकशीतून सत्य उलगडेल असे  बन म्हणाले&period; शरद पवार यांनीही स्पष्ट केले की हा अपघात होता यामागे घातपात नाही&period; राऊत हे शरद पवार यांच्यापेक्षा बुद्धिमान आहेत का असा सवाल उपस्थित करून बन म्हणाले की उद्या कोर्टाचा निर्णय आल्यानंतर सुद्धा राऊत म्हणतील की कोर्ट विकले गेले आहे&period; राऊतांचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास नसून त्यांनी पाकिस्तानच्या कोर्टात जावे असा खोचक सल्लाही दिला&period; या संपूर्ण प्रकरणात राऊत मात्र जाणीवपूर्वक खोटे नरेटिव्ह पसरवत आहेत&period; सातत्याने अजित दादांचा अपमान करणा-या राऊतांना अचानक अजितदादांप्रति प्रेम उफाळून आले आहे&period; मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे हीन काम संजय राऊत करत आहेत अशी प्रखर टीकाही त्यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>राऊत एकाच पत्रकार परिषदेत परस्परविरोधी भूमिका मांडतात<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दररोज पत्रकार परिषदेतून खोटे बोलायचे हा राऊतांचा व्यवसाय झाला आहे&period; भाजपाच्या भ्रष्टाचाराची फाईल अजितदादांकडे होती म्हणून म्हणे हे घडवून आणले असा बेताल आरोप राऊत करतात आणि त्याच पत्रकार परिषदेच्या शेवटी राऊत म्हणतात की पार्थ पवारांना भाजपा वाचवत आहे&period; एका पत्रकार परिषदेत तरी राऊतांनी एक भूमिका मांडावी&period; परस्परविरोधी वक्तव्ये करून राऊत हे स्वत&colon;चेच वक्तव्य खोडून काढण्याचे काम करत असून भान सुटल्यासारखे असंबद्ध बरळत आहेत अशी घणाघाती टीकाही बन यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version