किशोर साहू, मौदा :- गुरुवार (ता. १५ ऑक्टोबर)लाभ तालुक्यातील तारसा-माथनी जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या प्रनाग हायस्कूल आजनगाव त येथे मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिवस” म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विज्ञान शिक्षक गुणरत्न गजभिये होते. त्यांनी वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने विविध विषयासंबंधी पुस्तके दान स्वरूपात भेट दिले. यात इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेतील विविध पुस्तके होती. ज्यात विद्यार्थी विकास, शेती, विज्ञान, कथा, कविता, प्रेरणादायी गोष्टी इत्यादींचा पुस्तकांचा समावेश होता. अशा विविध पुस्तकाचे प्रत्यक्षात विद्यार्थ्यांसह वाचन करून वाचन प्रेरणा दिवस हा मोठा उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजू गेडाम यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक अवधूत खोब्रागडे व लिपिक सुनिल डोंगरे यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे उत्स्फूर्ततेने आणि मोठ्या आवडीने वाचन करून एकमेकास केलेल्या वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रम समाप्तीनंतर शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक गुणरत्न गजभिये यांच्याकडून खाऊचे वाटप करण्यात आले. अशा पद्धतीने हा नावीन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबवण्यात आला. याचा लाभ शाळेतील उपस्थित प्रत्येकाने घेतला.








