सावनेर :- नगरपरिषद सावनेर सार्वत्रिक निवडणुक २०२५ अनुषंगाने दि. २१/१२/२०२५ रोजी नगर भवन, नगर परीषद सावनेर येथे मतमोजणी होणार असुन गांधी चौक सावनेर येथे मोठया प्रमाणात गर्दी होवून वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४७नागपूर भोपाल हायवे, राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४७ ई गोंडखैरी सावनेर हायवे, राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४७ छिंदवाडा सावनेर हायवे, राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ सावनेर मनसर हायवे रोडनी सावनेर शहरात जड वाहतुक आल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा व वाहतुक सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून तसेच अपघाताची शक्यता टाळण्याच्या अनुषंगाने वाहतुकीचे नियमन व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, तसेच रोडवर गंभीर व प्राणाकित अपघात होवू नयेत याकरीता मा. श्री हर्ष ए. पोहार, पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या आदेशान्वये सदर अधिसुचना दि. २१/१२/२०२५ चे सकाळी ०६.०० वाजता पासुन ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत जड वाहतुक खालील प्रमाणे वळविण्यात आली आहे.
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ मतमोजणी अनुषंगाने सावनेर शहरात जाणारी जड वाहतुक वळविल्याबाबत…









