spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विभागीय महिला लोकशाही दिन १० ऑगस्ट रोजी

नागपूर :- येत्या १० ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी ११ वाजता विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी- अडचणींची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते.

विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येत असतो. या लोकशाही दिनासाठी अर्ज विहित नमुन्यात असावा, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे व तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा, तक्रार निवेदनावर यापूर्वी झालेल्या जिल्हा स्तरावरील महिला लोकशाही दिन समितीचा कार्यकारी अहवाल जोडणे आवश्यक आहे. (जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनात यापूर्वी केलेला अर्ज व त्यावरील कार्यवाही केलेला अर्ज असावा.)

न्यायप्रविष्ट प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक कागदपत्रे न जोडलेले, तसेच सेवाविषयक आस्थापना बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाही, असे विभागीय उपायुक्त महिला व बालविकास नागपूर विभाग यांनी कळविले आहे.

Popular Articles