spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या आणीबाणीवरील अनुभवांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन 

 

मुंबई, दि. 26 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणीबाणीतील अनुभवांवर आधारित ‘इमर्जन्सी डायरीज:इयर्स दॅट फोर्ज्ड अ लिडर’  (Emergency Diaries: Years that Forged a Leader’) या पुस्तकाचे प्रकाशन सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांच्या हस्ते गुरुवारी झाले. आणीबाणी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिगत राहून केलेले  काम, बंदी घालण्यात आलेल्या साहित्याचे  वाटप आणि जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न याची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विजय चौधरी, ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर, विजय (भाई) गिरकर, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते. ब्लू क्राफ्ट डिजिटल फाउंडेशन ने हे पुस्तक प्रकाशीत केले आहे.

 

Popular Articles