spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नामांतरातील शहीदांच्या कुटुंबीयांच्या त्यागाचे स्मरण करणे हीच खरी आदरांजली – विलास गजघाटे

नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर व्हावे, यासाठी सन १९७८ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ऐतिहासिक आंदोलन उभारण्यात आले. या आंदोलनात अनेक युवकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले व ते शहीद झाले. मात्र, अनेक वर्षे उलटूनही त्यांच्या कुटुंबीयांची अपेक्षित दखल घेणारा नेता पुढे आला नाही, ही खंत दीक्षाभूमी स्मारक समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विलास गजघाटे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी नागपूर येथील १० नंबर पूल परिसरातील नामांतर शहीद स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच नामांतर आंदोलनातील शहीदांच्या कुटुंबीयांच्या त्यागाचे स्मरण ठेवून त्यांना सन्मान व न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. याप्रसंगी शरद मेश्राम, सुनील भोसले, मिलिंद थुल, देवाजी रंगारी, अशोक शेंद्रे, विठ्ठलराव ढोगळे यांच्यासह अनेक आंबेडकरी कार्यकर्ते उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.