– मानवाधिकार संरक्षण संघटनेचा सामाजिक उपक्रम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कन्हान :- मानवाधिकार संरक्षण संघटना व्दारे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन कन्हान शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असुन अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
रक्तदान शिबिरात मेट्रो ब्लड बँक व डागा हॉस्पि टल, नागपुर यांच्या सहकार्याने रक्तसंकलन करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातुन रक्तदानाचे महत्त्व अधो रेखित झाले असुन गरजु रुग्णांसाठी आवश्यक रक्त साठा उपलब्ध होण्यास मोठी मदत झाली. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असुन प्रत्येक सुदृढ नागरिकाने वर्षातुन किमान एकदा रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले आहे. याप्रसंगी पत्रकार मोतीराम रहाटे, कमल यादव, सुनिल सरोदे व ऋषभ बावनकर यांचे मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छाने सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. जन हिताच्या उपक्रमांना योग्य प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकारां च्या कार्याचे आयोजकांनी विशेष कौतुक केले.पत्रकार हे समाजप्रबोधनाचे महत्त्वाचे माध्यम असुन सामाजिक चळवळींना बळ देण्याचे कार्य ते सातत्याने करीत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. रक्तदान शिबीर मानवाधिकार संरक्षण संघटना नागपुर जिल्हा अध्यक्ष पंकज रामटेके यांनी आयोजन करून यशस्वितेक रिता मनिष नंदेश्वर, प्रमोद चंद्रिकापुरे, सुमेध नितनवरे, रजनिश मेश्राम, ओमप्रकाश गुरधे, प्रणय बावनकुळे, शैलेश तांडेकर, बादल भेलावे, बबलु अन्सारी, प्रकाश गाते, राजेश आपुरकर, मिना रामटेके, सविता नाटकर, रीना चौबे, मीना, अर्चना शर्मा, निमा लुहुरे, गंगादिप सहारे आदी सह मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या पदाधिकारी, कार्यक्रत्यानी विशेष परिश्रम घेतले.
सदर रक्तदान शिबिरामुळे समाजात मानवतेचा, एकोप्याचा व सेवाभावाचा संदेश पोहोचला असुन अशा उपक्रमांमुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्विरित्या संपन्न झाला.








