– विविध रिपब्लिकन गट, राजकीय, सामाजिक, कामगार संघटना द्वारा गठीत ‘रिपब्लिकन लोकशाही मोर्चा’ येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढणार !!
नागपूर :- देशात तसेच राज्यात भयावह परिस्थिती आहे, शाळा बंद धोरण हे बहुजन विरोधी आहे. नवीन शैक्षणिक धोरण सर्व सामान्यासाठी घातक आहे. आरोग्य सेवा कंत्राटीवर जगत आहे. आरोग्य, शिक्षण व रोजगार या मुख्य समस्या आहेत. महिला असुरक्षित आहे. मागासवर्गीयांची शिष्यवृत्ती वेळेवर व पुरेशी मिळत नाही. सामाजिक न्याय दुरापस्त झाला आहे. शेकडो कोटी सामाजिक विभागाचे दुसरीकडे वळविले जात आहे याबाबत कुठल्याही राजकीय संघटना द्वारा विरोध केला जात नाही. ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक यांचे न्याय हक्क डावलले जात आहे. अनुसूचित जातीचे वर्गीकरण, 2 सप्टेंबरचा ओबीसीवर अन्याय करणारा बेकायदेशीर जी.आर., आरक्षण असे अनेक प्रश्न फक्त राजकीय ताकद निर्माण केल्यानेच सुटू शकतात म्हणून आम्ही एकजुटीने व संयुक्तपणे येणारी निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे.
रिपब्लिकन पक्ष वेगवेगळ्या गटात विभागला आहे त्यामुळे रिपब्लिकन जनता विभागली आहे. या गटाना एकत्र आणून सर्व पुरोगामी राजकीय, सामाजिक, कामगार संघटनांना जर एकत्र आल्या तर परिवर्तन होवू शकते. म्हणून ‘रिपब्लिकन लोकशाही मोर्चा’ येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगर पंचायत, महानगरपालिका निवडणूक विविध राजकीय समविचारी संघटना सोबत गठबंधन करून ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक समाजाचे विजन रोखण्यासाठी येणारी निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे रिपब्लिकन जनतेची एकजूट होऊन रिपब्लिकन ताकद उभी होईल.
राजकीय ताकद निर्माण झाल्याशिवाय समस्या सुटत नाही. म्हणून आम्ही सर्व गटाना एकत्रित करून एकास-एक उमेदवार देण्यासाठी सर्व रिपब्लिकन गट, विविध राजकीय, सामाजिक, कामगार संघटनाना आवाहन करीत आहो. आपण सर्व एक होऊ, एकजुट होवू व एकत्र लढू निश्चितपणे रिपब्लिकन जनता व ओबीसी, आदिवासी, बंजारा, आंबेडकराईट जनता साथ देईल.
नागपूर महानगरपालिका, नगर परिषद व जिल्हा परिषदसाठी निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा, सामाजिक कार्यात कार्य केले असल्यास कार्याचा अनुभव, मतदार संघ याबाबत आपण मो. नं. 9764607057, 9326887928, 9373129563, 9823368322 व 9422154223 या नंबरवर संपर्क करावा.
रिपब्लिकन लोकशाही मोर्चाद्वारा प्रचाराची सुरुवात झाली असून कामठी नगर परिषदेच्या निवडणूकीकरिता ‘कामठी नगर विकास कृती समिती’ स्थापन करण्यात आली असून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. ‘लडेंगे जितेंगे’ पत्र परिषदेला खालील उपस्थिती होती.
प्रा. जावेद पाशा, जनार्दन मुन, हरिष उईके, अनिरूद्ध शेवाळे, प्रा. मधुकर उईके, कॉ. राजेंद्र साठे, प्रताप पटले, दिनेश अंडरसहारे, प्रा. एम. एस. वानखेडे.




