नागपूर :- आंबेडकरी रिपब्लीकन मोर्चा च्यावतीने आयोजित कार्यक्रमात ज्यांना अनुसूचित जाती जमाती यांना मिळत असलेले आरक्षण खुपत असेल त्यांनी मागिल इतिहासाकडे वाकून पाहावे हजारो वर्षे यांच्या वर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अन्याय इथल्या जातिय व्यवस्थेने केला आज जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आरक्षण मिळाले आणि ते शासन देते आहे ते उपकार नाही व्यवस्थेने केलेल्या अन्यायाची परतफेडीची चुकारा आहे. असे प्रतिपादन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे यांनी केले. ते नागपूर येथे धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येल पत्रकार भवनाच्या सभागृहात आयोजित आरक्षण अंमल मेळाव्यात अध्यक्षस्थाना वरून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सुरदास सचिन अंभोरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पुरातत्व अधिक्षक नामदेवराव निकोसे, सम्राट धम्म सेनेचे अध्यक्ष रवी शेंडे, डॉ. आशा पारधे, डॉ. सुधा जनबंधू, प्रा.पुष्पा घोडके, धर्माजी बागडे, म्हाडाचे माजी लेखा अधिकारी जयदेव चिंवडे, देवेंद्र बागडे हे होते.

प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सुशिला जनबादे, कविता हिंगणकर, अनिता थुल यांनी पुष्पहार अर्पण केले तर माधूरी मगर यांनी दिपप्रज्वलन केले. धम्म सेवक सुधाकर टवले यांनी सामुहिक बुद्ध वंदना घेतली देवेंद्र बागडे यांनी प्रास्ताविक केले. बागडे पुढे म्हणाले आरक्षणाच्या खरा फायदा आमच्या तिल राजकीय आणि उच्च पदावर गेलेल्यांनी भरपूर प्रमाणात घेतला परंतु त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही त्यांच्या मागे उभा असलेला वर्ग आरक्षणाचा अंमलबजावणी करण्यासाठी धडपडत आहे. परंतु तो एकटा पडत आहे आजपण आमच्या साठी निर्माण करण्यात आलेल्या योजनेची तंतोतंत पालन होताना दिसत नाही अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा भागविण्यासाठी शासन दरबारी हेलपाटे मारावे लागतात त्याकडे सत्तेत बसलेले गडी गुपचूप आहेत जेव्हा शेतच कुंपण खात आहे मग अपेक्षा न केलेली बरी आता यासाठी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत लागले तेव्हाच प्रस्थापितांना चपराक बसेल असे बागडे यांनी ठणकावून सांगितले. याप्रसंगी चळवळीत ऊर्जा निर्माण करणारे अँड. महासुर्या बागडे, रवी शेंडे , गर्जना संघटनाचे अध्यक्ष महेश ठाकूर, रिपब्लिकन नेते दिनेश बनसोड, सुप्रसिद्ध गायिका अश्विनी खोब्रागडे, भागबाई मेश्राम, मंगला बिहारे, ज्योती रायबोले नम्रता बागडे यांच्या सत्कार शाल पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले स्वागताध्यक्ष म्हणून प्रा.रमेश दुपारे, वैशाली तभाने, हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रमेश दुपारे यांनी केले तर आभार धर्मा बागडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी के.टी.कांबळे, सुखदेवराव मेश्राम, राजु पांजरे, प्रकाश कांबळे, पुण्यशील बोदिले, सुरज ढोणे, शालिक बांगर, मनोहर इंगोले, प्रविण आवळे, चरणदास गायकवाड, गौतम बागडे, अमर बागडे, पंकज पाटील, राजु कांबळे, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात राज्यातील विविध जिल्हातील आंरिमोचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे प्रसिद्धी प्रसारण प्रमुख शाम बागुल यांनी माध्यमांना सांगितले.








