– हरकती व सूचना सादर करण्याची मुदत ९ ते १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत
यवतमाळ :- यवतमाळ जिल्हयातील नगरपरिषद यवतमाळ, पुसद, वणी, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, घाटंजी, पांढरकवडा, नेर- नबाबपूर व आर्णि आणि नगरपंचायत ढाणकी च्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनु. जाती, अनु. जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिलांसह) आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्हयातील नगरपरिषद यवतमाळ, पुसद, वणी, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, घाटंजी, पांढरकवडा, नेर-नवाबपूर व आर्णी आणि नगरपंचायत ढाणकी च्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनु. जाती, अनु. जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिलांसह) आरक्षण सोडत दिनांक ८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेवतीने प्राधिकृत केलेल्या अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे घेण्यात येणार आहे.
नगर परिषद/पंचायतचे नाव, नियुक्त प्राधिकृत अधिकारी, सभा घेण्याचे ठिकाण, सभा घेण्याची वेळ खलील प्रमाणे राहील.
यवतमाळ नियुक्त प्राधिकृत अधिकारी,उपविभागीय अधिकारी,यवतमाळ सभा घेण्याचे ठिकाण, नगर भवन, नगरपरिषद कार्यालय समोर यवतमाळ सभा घेण्याचे वेळ संकाळी 10 वाजता, पुसद नियुक्त प्राधिकृत अधिकारी, उपविभागीय अधिकारी, पुसद सभा घेण्याचे ठिकाण नगरपरिषद पुसद सभागृह वेळ दुपारी 3 वाजता, वणी नियुक्त प्राधिकृत अधिकारी उपविभागीय अधिकारी, वणी सभा घेण्याचे ठिकाण महसूल भवन, तहसिल कार्यालय वणी वेळ सकाळी 10 वाजता, उमरखेड नियुक्त प्राधिकृत अधिकारी उपविभागीय अधिकारी, उमरखेड सभा घेण्याचे ठिकाण नगरपरिष उमरखेड वाचनालय सभा घेण्याची वेळ सकाळी 10 वाजता, दिग्रस नियुक्त प्राधिकृत अधिकारी उपजिल्हाधिकारी, (रो.ह.यो.) यवतमाळ सभा घेण्याचे ठिकाण नगरपरिषद दिग्रस सभागृह सभा घेण्याची वेळ सकाळी 10 वाजता, दारव्हा नियुक्त प्राधिकृत अधिकारी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन),रस्ते प्रकल्प, यवतमाळ सभा घेण्याचे ठिकाण नगरपरिषद दारव्हा सभागृह सभा घेण्याची वेळ सकाळी 10 वाजता, घाटंजी नियुक्त प्राधिकृत अधिकारी उपविभागीय अधिकारी, राळेगाव सभा घेण्याचे ठिकाण सांस्कृतिक सभागृह नगरपरिषद घाटंजी सभा घेण्याची वेळ सकाळी 10 वाजता, पांढरकवडा नियुक्त प्राधिकृत अधिकारी सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, केळापूर सभा घेण्याचे ठिकाण शहीद नागेश्वर जिद्देवार सांस्कृतिक भवन, नगरपरिषद पांढरकवडा सभा घेण्याची वेळ दुपारी 3 वाजता, नेर-नबाबपूर नियुक्त प्राधिकृत अधिकारी उपविभागीय अधिकारी, दारव्हा सभा घेण्याचे ठिकाण नगरपरिषद नेर-नबाबपूर, सभागृह सभा घेण्याची वेळ सकाळी 10 वाजता, आर्णी नियुक्त प्राधिकृत अधिकारी उपजिल्हाधिकारी (सामान्य निवडणूक विभाग) यवतमाळ सभा घेण्याचे ठिकाण पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय नगरपरिषद आर्णी सभा घेण्याची वेळ सकाळी 10 वाजता, ढाणकी नियुक्त प्राधिकृत अधिकारी उपविभागीय अधिकारी, उमरखेड सभा घेण्याचे ठिकाण नगरपंचायत ढाणकी सभागृह सभा घेण्याची वेळ दुपारी 3 वाजता. याप्रमाणे राहील.
नगरपरिषद यवतमाळ, पुसद, वणी, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, घाटंजी, पांढरकवडा, नेर-नबाबपूर व आर्णी आणि नगरपंचायत ढाणकी यांचे आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी सदस्य पदाचे आरक्षण यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषद यवतमाळ, पुसद, वणी, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, घाटंजी, पांढरकवडा, नेर-नबाबपूर व आर्णी आणि नगरपंचायत ढाणकी यांचे कार्यालयाचे सुचना फलकावर तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयातील सुचना फलकावर, yavatmal.nic.in या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिध्दी करण्यात येणार असून कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येईल. तरी उक्त नगरपरिषद क्षेत्रातील ज्या रहिवाश्यांना या संबंधात काही हरकती व सूचना दाखल करावयाच्या असतील, त्यांनी संबंधित नगरपरिषद कार्यालयामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजीपासून ते दिनांक 14 ऑक्टोबर 2025रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत कारणासहीत लेखी स्वरुपात सादर कराव्यात. त्यानंतर येणाऱ्या हरकती व सूचना विचारात घेण्यात येणार नाही, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी कळविले आहे.








