पांढरकवडा :- जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ आणि महसूल प्रशासन, केळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रलंबित. कामांचा निपटारा करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा-१’ चे आयोजन करण्यात आले आहे. आज दि.०७ मार्च २०२६: चालबर्डी, १४ मार्च २०२६: केळापूर,१ एप्रिल २०२६: करंजी, १० एप्रिल २०२६ पहापळ, १७ एप्रिल २०२६: रुंझा,०८ में २०२६ पाटणबोरी,१५ मे २०२६ पांढरकवडा या कालावधीत तालुक्यातील विविध महसूल मंडळांमध्ये ही शिबिरे पार पडणार आहे.यामुळे प्रशासन अधिक गतीमान आणि लोकाभिमुख होणार आहे.नागरिकांच्या दैनंदिन महसूल विषयक तक्रारींचे एकाच ठिकाणी तात्काळ निवारण करणे आणि महसूल विभागाच्या सेवा थेट लोकांच्या दारी पोहोचवणे,हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे, या शिबिरात प्रलंबित फेरफार, ७/१२ व ८-अ उतार्यांमधील दुरुस्ती, आणि डिजिटल स्वाक्षरीच्या उताऱ्याच्ये वाटप.उत्पन्न,रहिवासी, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक दाखल्यांचे वाटप. अॅग्रीस्टैंक व पी. एम. किसान नोंदणी,सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे.घरासाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, अकृषिक (एन. ए) परवानगी प्रकरणांचा निपटारा आणि गाव दत्तक अद्यावत करणे.आणि विविध दाखल्यांचे वाटप केले जाणार आहे.विशेष म्हणजे या शिबिरात महसूल विभागासोबतच नगर परिषद, पंचायत समिती, आरोग्य व इतर विभागांच्या सेवा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांना या शिबिरात आपल्या प्रलंबित कामांचा निपटारा करून घ्यायचा आहे,त्यांनी संबंधित महसूल मंडळाच्या शिबीर दिनांकापूर्वी आपले अर्ज ग्राम महसूल अधिकारी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील नागरिकांचा वेळ आणि श्रमाची बचत होणार आहे.








