spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सेवा हक्क दिवस साजरा

– अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

भंडारा :- महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत आज सेवा हक्क दिवसानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवा हक्क कायदयाबाबत परिषद कक्षात शपथ दिली.

त्यामध्ये मी गांभीर्य पुर्वक शपथ घेतो की, महाराष्‍ट्र लोक सेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत शासनाच्या सेवा पारदर्शक पध्दतीने विहीत काल मर्यादेत व सौजन्याने पात्र नागरिकांना देण्याकामीमला सुपुर्द करण्यात आलेली जबाबदारी पुर्ण प्रामाणिकतेने, निष्ठेने, सचोटीने, संवेदनशीलतेने व तत्परतेने पार पाडण्यासाठी मी कटीबध्द राहीन. मी सेवा वितरण प्रक्रीयेत कोणत्याही प्रकारचा विलंब,अडथळा,कींवा भष्ट्राचार होणार नाही यासाठी आवश्यक पावले उचलेन. मी नागरिकांना उक्त कायदयाने प्रदान केलेल्या सेवेच्याहक्काचा आदर ठेवून व सेवाभाव ठेवून त्यांच्या हितार्थ व कल्याणार्थ काम करेन.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण आणी अन्य्‍ कर्मचारी अधीकारी उपस्थित होते. यावेळी सेवा हक्क कायदया विषयी माहिती देण्यात आली त्यामध्ये डिजिटल मंचाचा उपयोग करुन लोक सेवा वितरणा मध्ये सक्षमता व पारदर्शकतेच्या संस्कृतीस चालना देण्यावर या कायद्याचा भर आहे. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक सेवांचा दर्जा उंचावणे व त्या विहित कालावधीत जबाबदारी पूर्वक पुरविल्या जातील याची खात्री करणे हे या कायद्याचे प्राथमिक उदिष्ट असल्याचे सांगितले.

लोक सेवा हक्क प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या कालावधीच्या आत आणि त्या नंतर वेळोवेळी ते पुरवीत असलेल्या लोकसेवा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपीलीय प्राधिकारी आणि द्वितीय अपीलीय प्राधिकारी यांचा तपशील आणि नियतकाल मर्यादाया अधिनियना खाली अधिसूचित आहे.

Popular Articles