spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बेला येथे शाही उर्स संदल उत्साहात

बेला :- बाजार चौकातील हजरत गौसपाक छिल्ला शरीफ बच्चा पार्टीच्या वतीने उर्स शरीफचा पन्नासावा शाही संदल यंदाही उत्साहात साजरा करण्यात आला.स्व. रज्जाक बाबा यांनी बेला येथे ही प्रथा सुरू केली. ती अजूनही सुरू आहे. शेकडो युवक व नागरिकांनी संदलमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे उत्साही वातावरण यावेळी दिसून आले.

नयनरम्य विद्युत प्रकाशझोतात व संदलचे ढोल ताशाच्या निनादात विविध प्रात्यक्षिक दाखवत बाजारातून संदलची रॅली निघाली होती. ती मुख्य मार्गाने वाजत गाजत संपूर्ण गावात फिरली. त्यानंतर गाव तलावाचे पाळीवरील दर्गाह मध्ये संदलचा समारोप झाला. यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. दुसऱ्या दिवशी दर्गाहवर झालेल्या महाप्रसादाचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला. उर्स संदलचे निमित्ताने गावात एकता व सलोख्याचे दर्शन घडले. यशस्वीतेसाठी संदीप गवते (पाटील), माजी सरपंच सुभाष तेलरांधे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजू तिमांडे, जावेद शेख, दिलीप भाजीपाले, जयराज खापर्डे,शाम खापर्डे, दशरथ झगडे, गोपीनाथ झगडे,नितीन तीमांडे, सागर कपाट,मुकेश वाकडे, इरफान शेख, रवी बावणे, हितेश तिमांडे, नवेद खान, राजा शेख,विनोद मंडलिक महेश गोहणे, दीपक झगडे,राहुल गाते,राजू यशवंत तिमांडे, अमोल भाजीपाले,आकाश भाजीपाले, चिंतामणबाबा गोहणे, मोनू शेख व अनेकांनी अथक परिश्रम घेतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.