नवी दिल्ली, २० : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची शपथ दिली.
यावेळी आर. विमला यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण केली.








