spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपातर्फे माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ राजीव गांधी यांना अभिवादन

राष्ट्रीय स‌द्भावना दिनानिमित्त कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

नागपूर, ता.२० : नागपूर महानगरपालिकाद्वारा देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता.२०) विनम्र अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील दालनात आयोजित छोटेखानी समारंभात मनपाच्या अतिरिक्त आयुक्त   वसुमना पंत यांनी माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ राजीव गांधी  यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पाळण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय स‌द्भावना दिनानिमित्त’ उपस्थितांना शपथ दिली.

याप्रसंगी मनपाच्या उपायुक्त विजया बनकर, उपायुक्त  राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त  विकास रायबोले, सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक  राजकुमार मेश्राम, जनसंपर्क विभागाचे  अमोल तपासे, विनय बगले,  प्रमोद हिवसे यांच्यासह मनपाचे अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते. तसेच मनपा मुख्यालयातील  विपक्ष नेता कार्यालयात माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ राजीव गांधी  यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याशिवाय अजनी चौक येथील स्व. राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनपातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.

Popular Articles