– शौर्य,श्रावणी व आर्यन सुद्धा चमकले !
– पालकमंत्री बावनकुळे यांचे हस्ते गौरव
बेला :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बेला नजीकच्या सालईराणी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची आकांक्षा श्रीकृष्ण पुरके या आदिवासी विद्यार्थिनीने महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक पटकावला. याशिवाय त्याच शाळेतील शौर्य नितीन आत्राम,बेला येथील श्रावणी पवन लांडे व कवडापूर येथील आर्यन प्रकाश कातलाम यांनी दहावा क्रमांक मिळविला.
या चार विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या मेरिट यादीत चमकदार कामगिरी केल्याबद्दल त्यांना स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर येथील कार्यक्रमात गौरविण्यात आले.नागपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी विनायक महामुनी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश गुंड यांनी ग्रामीण भागातील या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.सालईराणी येथील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका श्वेता कुरझडकर यांचे मार्गदर्शनाखाली दैदीप्यमान यश प्राप्त केले. उमरेडचे गटशिक्षणाधिकारी मनोज पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी निरंजन गायकवाड, बेला केंद्रप्रमुख पुष्पा बोरजे, सालईराणी येथून बदलून गेलेले माजी मुख्याध्यापक प्रफुल्ल नरताम व सरपंच सोनाली पेंदाम,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन आत्राम, विद्याधर कन्नाके, समितीचे सर्व सदस्य व गावातील नागरिकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.








