spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वाळू रेती निर्गती धोरण जाहिर

गडचिरोली :- वाळू रेती निर्गती धोरण-२०२५ जाहिर करण्यात आलेले आहे. ग्रामपंचायत हद्दीमधील वाळुस्थळातुन वाळु उत्खननाकरीता केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन व वातावरणीय बदल मंत्रालय भारत सरकार) यांचेकडील दिनांक २८ मार्च, २०२० च्या अधिसूचनेतील APPENDIX-IX EXEMPTION OF CERTAIN CASES FROM REQUIREMENT OF ENVIRONMENTAL CLEARANCE मधील मुद्दा क्र. ४ मधील तरतुद “Customary extraction of sand and ordinary earth from sources situated in Gram Panchayat for personal use or community work in village” ग्रामपंचायत हद्दीमधील वाळुस्थळातुन वाळु उत्खननाकरीता केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय (भारत सरकार) यांचेकडील दिनांक २८ मार्च, २०२० च्या अधिसूचनेतील APPENDIX-IN मधील अनुक्रमांक ४ नुसार निश्चित वाळूगट तसेच, ज्या वाळूगटास पर्यावरण अनुमती प्राप्त झाली आहे. व जे वाळूगट लिलावामध्ये गेलेले नाही असे नदी नाले,ओढे इत्यादी मधील वाळूगट स्थानिक वापरासाठी विविध शासकीय विभागांचे कामासाठी व घरकुलासाठी देण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आलेले आहे.

धानोरा तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे सुरु असलेल्या शासकीय कामामधील अंदाजपत्रकातील नमुद वाळु परिमाण रु. 600/- प्रती ब्रास स्वामित्वधन रक्कम, जिल्हा खनिज प्रतिष्ठाण निधी (१०%) व इतर अनुज्ञेय रकमेचा भरणा करुन उत्खनन व वाहतुक करण्यासाठी मौजे सालेभट्टी येथील वाळु गट निश्चित करण्यात आलेला आहे.

त्यानुसार धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील आपले अधिनस्त शासकीय बांधकामासाठी https//mahakhanij.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज करण्यासाठी आपले अधिनस्त अधिकारी/कर्मचारी/ ठेकेदार यांना दि. २९ ऑक्टोबर २०२५ ते दि. ३१ मे, २०२६ या कालावधीत वाळु गट उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

त्यानुसार आपल्या विभागाच्या/आपल्या अधिपत्याखालील आस्थापनाच्या धानोरा तालुक्यातील चालू किंवा प्रस्तावित शासकीय कामांच्या मंजूर अंदाजपत्रकानुसार आवश्यक प्रमाणात वाळूची मागणी https://mahakhanij.maharashtra.gov.in या पोर्टलवरून ऑनलाइन वाहतूक पास (Transit Pass) उपलब्ध करुन देण्यात येतील. वाहतुकीसाठी वापरावयाच्या वाहनांना GPS बसवुन सदर वाहन उक्त पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर गटातुन वाळु उत्खनन व वाहतुक (सोमवार ते शुक्रवार) सकाळी १०.०० ते सायकाळी ६.०० पर्यंत करता येईल. असे तहसिलदार, धानोरा गणेश माळी यांनी कळविले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.