– जगतगुरु संत तुकाराम महाराज स्मारक समिती तर्फे आयोजन
नागपूर :- प्रभाग क्रमांक ३० मधील तुकोबाग्राम येथील हनुमान मंदिरात कार्तिक मासाचे औचित्य साधून जगद्गुरू संत तुकाराम महाराज स्मारक समिती तर्फे संतपूजन कार्यक्रमात भक्तिमय वातावरणात तेआयोजन करण्यात आले. कार्यक्रमात संत तुकाराम महाराज , संत ज्ञानेश्वर व आदि संतांच्या कार्य वर प्रा शरद वानखेडे यांनी प्रकाश टाकला, व आज देखील संतांचे विचार मार्गदर्शक आहे. ते विचार आचरणात आणण्याची आवशकते वर भर टाकले. या प्रसंगी संतांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला मनपा चे विरोधी पक्ष नेते संजय महाकाळकर दीपकजी कापसे, रितेश पांडे, राम खुंभळकर, शकील पटेल, श्याम थोरात, किशोर गीद, प्रदीप काकडे, परमेश्वर राऊत, सुप्रिया तिजारे, नितेश समर्थ, राजू फुटाणे, मयूर घोडे, प्रदीप काकडे, प्रवीण आग्रे, नुपूर मते, राजेश वनकर, मधुकर डेंगे, गौरव घाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. चिंतामणराव गोंडेकर व समूह ने भजन-कीर्तन व संतविचारांच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण केले.या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रवीण विघरे, दिलीप राऊत, विनोद पवार, उमेश गोंडेकर, पल्लवी राऊत, माधुरी धोटे, स्नेहा राऊत व संपूर्ण जगद्गुरू संत तुकाराम महाराज स्मारक समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले.








