spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एफ-२ वाघिणीच्या नर बछडा पेंचमध्ये दाखल

– स्वतंत्र अधिवासाच्या शोधात वाघाचा प्रवास पेंचच्या जंगलात

सचिन चौरसिया, रामटेक :- पेंच व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक घडामोड समोर आली आहे. उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातील गोठणगाव परिसरातील प्रसिद्ध ‘एफ-२’ वाघिणीचा बछडा (दि.२९) रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या चोरबाहुली प्रवेशद्वाराजवळ दिसून आला. स्वतःच्या अधिवासाच्या शोधात असलेला हा तरुण वाघ पेंचच्या परिसरात दाखल झाल्याने वाघांचे नैसर्गिक स्थलांतर आणि वन्यजीव कॉरिडोर ची सुलभता क्षमता स्पष्ट होत असल्याची चित्र आहे.

वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, हा वाघ कुही, भंडारा, रामटेक, पवनी, पवनी बफर आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ परिसरातून चोरबाहुलीमार्गे पेंचमध्ये दाखल झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. अर्थात, या कॉरिडॉरची सलगता आणि कार्यक्षमता अधिक स्पष्ट करण्यासाठी सखोल वैज्ञानिक अभ्यास व देखरेख आवश्यक आहे. सध्या हा बछडा स्वतःचे अधिवास क्षेत्र (टेरिटरी) शोधण्यासाठी या परिसरात भ्रमंती करत आहे. चोरवाहुली वन्यजीव क्षेत्रात वनविभागाने राबविलेली निरंतर गस्त, अधिवास सुधारणा, पाणी साठवण, वनबंधारे उभारणी आणि स्थानिक लोकसहभाग यामुळेच हे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.

‘एफ-२’ वाघिणीचा बछडा तरुण वाघांच्या स्थलांतराचे उत्तम लक्षण आहे. हा वाघ येथेच स्थायिक होतो की पुढे जातो. हे स्पष्ट होण्यासाठी काही काळ निरीक्षण करावे लागणार आहे. या तरुण वाघाला सुरक्षित अधिवास मिळावा आणि पेंचमधील वाघांची संख्या स्थिर राहावी, यासाठी वनविभाग कटिबद्ध आहे.

अक्षय गजभिये, उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प,

Popular Articles